News24 Today

Latest News in Hindi

महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त समतादूत यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती पुस्तिका वाचन करण्यात आली

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,-दिनांक 1 मे 2022 ला महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गोंदिया तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांच्या संयुक्त विदयमाने सामाजिक न्याय विभाग योजना तसेच बार्टी विभाग च्या योजना समतादूत संदेश ऊके यांच्या मार्फ़त ग्रामपंचायत स्थरावर कार्यक्रम राबविण्यात आले सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्रामंचायत सावंगी ग्राम. बाम्हनी व ग्राम. कोहमारा येथे पार पडला. त्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती पुस्तिका व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या योजनांची माहिती पुस्तिकेचे वाचन करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत चे मा. पठान ( सरपंच सावंगी) ग्राम.सदस्य व गावकरी मा. सरिता तरोने (सरपंचा बाम्हनी) सदस्य व गावकरी मा. वंदना थोटे (सरपंचा कोहमारा ) मा.ग्रासेवक शहारेसर ,सदस्य व गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते … सडक/अर्जुनी तालुक्यातील इतर ग्रामपंचायत मधे सुद्धा योजनेच्या माहिती पुस्तकाचे वाचन करण्यात आले.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *