news24today

Latest News in Hindi

गोंदिया विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई, अवैध रित्या कत्तली करिता जनावरांची वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात, 6 लाख 65 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.

1 min read

गोंदिया,11 जानेवारी 2023- गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच जिल्ह्या तील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे यांनी विशेष पथकास याबाबत आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.

दिनांक-10/01/2023 रोजी विशेष पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे- सालेकसा परीसरातील मौजा- कवडी चौक, साखरीटोला ता. सालेकसा येथे रात्र दरम्यान नाकाबंदी करून 01.45 वाजता दरम्यान छापा कारवाई केली असता-

1) निर्मित रतनसिंग चंदेल वय 32वर्षे रा. योगी अरविंद नगर, वंजारी ले आऊट, आपेवडी. ता.जि- नागपुर

2) शेख नदीम शेख सुलतान वय 33 वर्ष रा. भाजिमंडी कोळसा टाल, ता. कामठी जि- नागपूर

हे त्यांचे ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH-35 K- 3252 वाहन मध्ये एकुण 13 बैल, गाय, गोरे (जनावरे) पिकअप चे डाल्यात अवैध रित्या, निर्दयतेने कोंबून, डांबुन व बांधुन त्यांचे चारा- अन्न पाण्याची कोणतीही सोय व व्यवस्था न करता वाहतुक करतांनी मिळुन आले.

सदर मिळून आलेल्या पिकअप च्या डाल्याची पाहणी केली असता पिक अप चे डाल्यात, मध्ये 13 नग बैल, गाय, गोरे जातीची जनावरे कोणत्याही प्रकारची हालचाल न करता कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र MH 35 k – 3252 किंमती अंदाजे 6,00,000/-रु. व 13 जनावरे (बैल, गाय, गोरे) किंमती 65,000 /- रू चे असा एकुण 6, लाख 65 हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला.

तसेच सदर पिकअप च्या डाल्या मधील जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारापाण्याची व्यवस्था व्हावी या करीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था, खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणी आरोपी आरोपी नामे-
1) निर्मित रतनसिंग चंदेल वय 32वर्षे रा. योगी अरविंद नगर, वंजारी ले आऊट, आपेवडी. ता.जि- नागपुर.
( 2) शेख नदीम शेख सुलतान वय 33 वर्ष रा. भाजिमंडी कोळसा टाल, ता. कामठी जि- नागपूर.

यांचे विरुध्द पोलीस ठाणे सालेकसा येथे कलम 11(1) (ड) (ई) (ग) (फ) (ह) प्रा.नि.वा.का. 1960, सहकलम 5(अ),2, 9 महा. पशु. सं. अधि. 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

दोन्ही आरोपीतांना सालेकसा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सालेकसा पोलीस करीत आहेत.

सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे विशेष पोलीस पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा.पो.शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *