ग्राम कोहमारा येथे तान्हा पोला मोठ्या उत्साहात साजरा.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी- तालुक्यातील ग्राम कोहमारा येथे पहिल्यांदाच पण मोठ्या उत्साहात शनिवारला तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोहमारा ग्रामवासियांतर्फे मुख्य चौक कोहमारा येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वेशभूषा, नंदी बैल सजावट याकरिता युवा मंडळ तर्फे प्रथम बक्षीस 1000, द्वितीय 700,तृतीय 500 तसेच प्रोत्साहन बक्षीस म्हणून प्रत्येकी 100 रुपये ठेवण्यात आले. या स्पर्धेत एकूण 42 मुलांनी विविध वेशभूषा व आकर्षक नंदी बैल सजावट करून सहभाग घेतला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दूधराम डोंगरवार, शिवराम गहाणे, राजेश मुनीश्वर, अनिल दीक्षित, ब्राम्हणकर यांनी काम पाहिले. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिप सदस्य कविता रंगारी, मिलन राऊत, एफ आर टी शहा, वंदना थोटे, प्रल्हाद वरठे, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रथम क्रमांक अन्वी राघोर्ते, द्वितीय क्रमांक राजवी शिवणकर, तृतीय आयुष उके यांनी पटकविले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर प्रोत्साहन बक्षीस प्रत्येकी 100 रुपये रोख आयोजक कोहमारा येथील युवकांच्या हस्ते देण्यात आले.

