News24 Today

Latest News in Hindi

सडक अर्जुनी ; नगराध्यक्षासह प्र. मुख्याधिकारी व इतर नगरसेवक लाच घेताना लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात…

1 min read

सडक अर्जुनी,दि.१४: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी आणि नायब तहसिलदार व प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे व नगरसेवक याना १ लाख ८२ हजाराची लाच घेतल्याप्ररकरणात एसीबीने आज अटक केली.
🔴तक्रारदार
पुरूष, वय ५६वर्ष,
रा.लाखनी , ता.लाखनी जि.भंडारा
🔴आरोपी ईतर लोकसेवक
१) तेजराम किसन मडावी वय ६६ वर्ष नगराध्यक्ष, नगर पंचायत, सडक अर्जुनी, रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
२) आलोसे
शरद विठ्ठल हलमारे वय ५६ वर्ष धंदा नोकरी , नायब तहसीलदार, तहसील कार्यालय,सडक अर्जुनी, अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी ,नगर पंचायत,सडक अर्जुनी ( वर्ग२) रा. सेंदुर वाफा,ता.साकोली जि. भंडारा
३) ईलोसे
अश्लेश मनोहर अंबादे वय ३५ वर्ष, सभापती बांधकाम समीती, न. प. सडक अर्जुनी रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
४) ईलोसे
महेंद्र जयपाल वंजारी वय ३४ वर्ष नगरसेवक न. प. सडक अर्जुनी रा. सडक अर्जुनी जि. गोंदिया
५) खाजगी ईसम जुबेर अलीम शेख @ राजू शेख
(नगर सेविका हीचा पती) रा. प्रभाग क्रं ४,सडक अर्जुनी. जि. गोंदिया
६) खाजगी ईसम
शुभम रामकृष्ण येरणे वय २७ वर्ष धंदा व्यापार. रा.सडक अर्जुनी जि. गोंदिया.
🔴तक्रार प्राप्त 13/5/2024
🔴पडताळनी
दि.13/05/2024
🔴लाच मागणी रु.1,82,000/- ( 12,15,634/- रू रकमेवर 15% प्रमाणे)
🔴घटनास्थळ- नगर पंचायत कार्यालय सडक अर्जुनी व आरोपी क्रं १ याचे निवासस्थान सडक अर्जुनी जि. गोंदिया.
🔴कारण :- तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असुन त्यास नगर पंचायत सडक अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन
2023-24 लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या असून तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली आहे.कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या १५% रक्कम लाच मागणी केली असल्याची तक्रार केली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी नगराध्यक्ष यांची भेट घेण्यास सांगितले वरून नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता ईलोसे क्रं १ याने निविदा रक्कम रू १२,१५,६३४/-रकमेवर १५% टक्के प्रमाणे रू १,८२,०००/- लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी क्रं २ ते ५ यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रं १ याने लाच रक्कम आरोपी क्रं ६ याचे दुकानात देण्यास सांगितले वरून आरोपी क्रं ६ याने लाच रक्कम स्विकारली. सदर आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी क्रं, १,२,३,४ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
🔴मार्गदर्शन
मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
श्री. सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.
श्री संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र
🔴पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे
पोलीस उप अधीक्षक
ला. प्र. वि. गोंदिया.
🔴सापळा -अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल तवाडे
🔴सापळा कार्यवाही पथक
विलास काळे, पोलीस उप अधीक्षक,पोनी अतुल तवाड़े, पो. नि. उमाकांत उगले.
स.फौ.चंद्रकांत करपे
पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले ,चालक नापोशि दिपक बाटबर्वे
हैश वैल्यू घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *