महाराष्ट्र बंद समर्थनार्थ अर्जुनी मोरगाव तालुका बंद राहणार
महविकास आघाडी घटकपक्ष पदाधिकाऱ्यांचा निर्णय…
1 min read
• महाराष्ट्र बंद समर्थनार्थ अर्जुनी मोरगाव तालुका बंद राहणार,
महविकास आघाडी घटकपक्ष पदाधिकाऱ्यांचा निर्णय
गोंदिया,अर्जुनी मोरगाव,09 ऑक्टोबर 2021- निर्दयी केंद्र शासनाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलकांवर निर्दयीपणे गाडी चालवून हत्या केली. त्याचा निषेध नोंदवून हत्याराला अटक करून गुन्हा दाखल करावा.यासाठी महाराष्ट्र राज्य बंद करण्या संदर्भात अर्जुनी मोरगाव तालुका कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय तालुक्यातील महाविकास आघडी सरकारातील राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथील सभेत घेतला .
अर्जुनी मोरगाव तालुका 11 ऑक्टोंबर 2021ला कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारला पूर्णपणे समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावातील शाळा ,व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सोमवारला बंद ठेवून दुपारी 11 वाजता दुर्गा चौक अर्जुनी मोरगाव येथून निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी व्हावे. नंतर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहेत. यावेळी तालुक्यातील शेतकरी ,शेतमजूर, व्यवसायिक, व्यापारी, महिला व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राहण्या संदर्भात निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये घेण्यात आलेल्या बंद समर्थनात सभेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,लोकपाल गाहाने, बंशिधर लंजे ,संजय पवार विजय सिंह राठोड ,राकेश लंजे, कृष्णा शहारे ,प्रकाश उके, यादव कुंबरे, रविचंद्र देशमुख, योगेश नाकाडे ,चंद्रशेखर नाकाडे, उद्धव मेहेंदळे ,राकेश जयस्वाल ,वीरेंद्र जीवानी ,राजेंद्र जांभूळकर, भोजराम रहिले ,त्रिशरण सहारे व इतर उपस्थित होते