डव्वा येथे “एक गाव, एक मंडई” या विषयावर या विषयावर सभा आयोजित करण्यात आली…
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,डव्वा, 09 ऑक्टोबर 2021- आज दि.९/१०/२०२१ ला ग्रामपंचायत डव्वा येथे ग्रामपंचायत पदाधिकारी,तमुंगा पदाधिकारी,नाट्य मंडळ प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी यांची *एक गाव,एक मंडई* या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती.त्यातील निर्णय खालील प्रमाणे घेण्यात आले.
१) ठरल्याप्रमाणे मंडई दि.१३/११/२०२१ रोज शनिवार ला भरविण्यात येईल.
२)मंडई भरण्याचे स्थळ मेण रोडवर राहील.आदर्श राईस मिल ते धान खरेदी सोसायटी डव्वा पर्यंत.
३)रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम कोणताही इच्छुक मंडळ आयोजित करू शकतो.मात्र स्री व पुरुष एकत्र बसून बघता येईल असेच कार्यक्रम करता येतील.
४) दुसऱ्यांदा मंडई आयोजित करता येणार नाही.ईतर कोणत्याही कार्यक्रमाअंतर्गत नाटक वैगेरे आयोजन करण्यास हरकत नाही.
५) कोणतेही कार्यक्रम करतांनी शासनाने घालून दिलेले निर्बंध त्यानुसारच वागने सर्वांना बंधनकारक राहील.
अशे निर्णय घेण्यात आले.