लोहिया शाळेतील संस्थापक यांचा 66 वाढदिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा.
1 min readगोंदिया,सौंदड:- सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक- संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांचा 66 वा वाढदिवस मोठ्या हर्षोल्हासात दि.२९ सप्टेंबर २०२१ला साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने मा.जगदीश लोहिया ,संस्थापक – संस्थापक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात भगवान गणेशजींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी मा.सुभाषचंद्र अग्रवाल- माजी अध्यक्ष, मा.प्रभुदयाल लोहिया, मा.प्रेमलता लोहिया, मा.पुनीत गुप्ता, मा.आ. न.घाटबांधे- उपाध्यक्ष,मा.पंकज लोहिया, मा.परेश लोहिया, मा.चिंतामण थेर सर, मा.अनिल मेश्राम सर,मा.शाहिद पटेल, मा.बिरला गणवीर, मा.आर.व्ही.मेश्राम, मा.पायल योगेश सिंघनिया, मा.प्रणाली गुप्ता, मा.सपनेश लोहिया, मा.सचिन लोहिया, मा.आशु सिंघानिया, मा.पायल लोहिया, मा. स्नेहा लोहिया मा.शिल्पा लोहिया, मा.साक्षी लोहिया, मा.रामचंद्र भेंडारकर, मा.शमीम अहमद, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे ,हेडमिस्ट्रेस संयुक्त जोशी, पर्यवेक्षिका कल्पना काळे, कणव,विधी, राशी,पलश लोहिया, युविका गुप्ता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
हा वाढदिवस सोहळा म्हणजे भारतीय संस्कृतीतील प्रेम, कृतज्ञता, समर्पण, आदर इत्यादी मूल्ये भारतीय जनमानसात किती खोलवर रुजलेली आहेत याची प्रचिती देणारा ठरला. तसेच संघर्षरत व्यक्तिमत्व असलेल्या मा.जगदीश लोहिया यांच्या जीवनात आनंद पेरण्याच्या संस्थेतंर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा अल्पसा प्रयत्न होय.
यावेळी संस्था, विविध समित्यांचे सदस्य व परिवारातील सदस्य तसेच नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रत उपस्थित सर्वांनी मा.जगदीश लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.