News24 Today

Latest News in Hindi

खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितित जब्बरटोला इथे भाजपा ची सभा संपन्न

1 min read

स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून भाजप समर्थ बूथ अभियानात सहभाग नोंदविला

गोंदिया,16 सप्टेंबर 2021: स्थानिक जिल्हा परिषद क्षेत्र नागरा अंतर्गत जब्बरटोला इथे आज दिनांक 14 सेप्टेंबर रोजी भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार श्री सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थ बूथ अभियान अंतर्गत बूथ स्तरीय समिति गठन तसेच संगठनात्मक सभा घेण्यात आली. यात पक्षाला बळकट बनविण्यासाठी साठी सर्व कार्यकर्त्यानी समाजात जाऊन केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचावे व त्याचा लाभ मिळून द्यावे तसेच आपसातले मत भेद विसरून पक्ष वाळी साठी काम करावे. आपण जगातील सर्वात मोठे पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यासाठी आपन सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे असे या कार्यक्रमात बोलताना खासदार श्री सुनील जी मेंढे म्हणाले.

सभेत प्रामुख्याने नागरा जिल्हा परिषद क्षेत्राचे सर्व शक्ति केंद्राचे बूथ अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच-पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत मोठ्या संख्येत युवा कार्यकर्ते यांनी उपस्थिति नोंदविली.

सदर आयोजन जिल्हा महामंत्री संजुभाऊ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष किसान आघाडी संजय टेंभरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ बिसेन, जिल्हा सचिव योगराज रहांगडाले, तालुका महामंत्री देवचंद नागपूरे, गजेंद्र फुंडे, अनुसूचित-जाती आघाडी तालुकाध्यक्ष राजकुमार गनवीर, युवा-मोर्चा तालुकाध्यक्ष तिजेश गौतम, जब्बरटोला सरपंचा सौ.वच्छला चिखलोंडे, उपसरपंच सेवकराम चिखलोंडे, सदस्या सौ.नीलिमा शहारे, नागरा सरपंच धनलाल नागपूरे, सुरेंद्र लिल्हारे, राजेश नागरिकर, गुलाब बिसेन, केवलचंद बघेले, थामनलाल लिल्हारे, राजकुमार सुलाखे, भेजेंद्र जैतवार, किशोर पंचबुद्धे, हीरालाल लिल्हारे, अजय लिल्हारे, प्रतुल गनवीर व इतर सर्व स्थानिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितित संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *