ठाणेदार सचिन वांगडे यांची तालुक्यातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी, 16 सप्टेंबर 2021- सध्या सर्वत्र गणेश उत्सव सुरू असून गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अवैध दारूविक्री करणारे व सट्टा जुगार खेळणाऱ्या वर वचक बसावा आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडावे याकरिता डूग्गीपार स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिनांक 01/09/2021 ते 15/09/2021 पर्यंत अवैध दारू विकणारे व जुगार खेळणाऱ्या विरूद्ध विशेष मोहीम राबवून पोलीस स्टेशन डूग्गिपार परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा घरी धाड घालून 11 आरोपी विरूद्ध 11 गुन्हे दाखल करून 8610 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले . तसेच सट्टा जुगार खेळणाऱ्या 9 आरोपी विरूद्ध 2 गुन्हे दाखल करून 18940 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर विशेष मोहीम कारवाही ठाणेदार सचिन वांगडे , सपोनी संजय पांढरे व पोलीस स्टेशन येथील अमलंदार यांनी केली.