- 18 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत 32 ग्रामपंचायतींशी थेट संवाद.
अर्जुनी-मोर : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची विकास कामे, शासकीय योजना, सुविधा, आणि स्थानिक प्रश्नावरील प्रत्येक्ष संवाद साधण्यासाठी वसा लोककल्याणाचा अर्जुनी मोरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा “गाव संवाद दौरा” आपल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिक शेतकरी बंधू भगिनींच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे तसेच गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले प्रशासकीय निर्णय त्वरित घेण्यासाठी व गावनिहाय विकासाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी या विभागाचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांचा ग्रामपंचायत निहाय “गाव संवाद दौरा” 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आला असून यावेळी ते 32 ग्रामपंचायतींना थेट भेट देऊन जनतेच्या समस्या ऐकून घेणार आहेत.
या गाव संवाद दौऱ्यात गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर , जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, गाव संवाद दौरा 18 सप्टेंबरला चान्ना/ बाकटी, सिलेझरी, निमगाव, २५ सप्टेंबरला बाराभाटी, मोरगाव, निलज, माहूरकुडा, 3 आक्टोंबर ला भडंगा, बबई, गिधाडी, आंबेतलाव, कालीमाटी, हिराटोला, 4 आक्टोंबर ला परसोडी/ रयत, झाशीनगर, येरंडी/ दर्रे, प्रतापगड, 16 ऑक्टोबरला भरणोली, ईळदा, कशोरी, वडेगाव बंध्या, 17 ऑक्टोबरला गौरनगर,अरुणनगर, महागाव, नवनीतपूर, धाबेटेकडी या 32 गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. जनतेनी व शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व मागण्या लेखी स्वरुपात फोन नंबर सह देण्यात याव्या या ग्रामपंचायती निहाय गाव संवाद दौऱ्याप्रसंगी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.