News24 Today

Latest News in Hindi

BREAKING NEWS : शाळेत नवजात बालकाचा अर्भक मिळाल्याने परिसरात खळबळ

सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : ०१ नोहेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम राका येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौचालयात जिवंत नवजात बालकाचा अर्भक मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज ०१ नोहेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७ वाजता ही घटना उघळकीस आली आहे. गावातील काही सूत्रांनी माहिती दिली आहे. की सायंकाळी शाळेच्या परिसरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने काही लोकांनी पाहणी केली असता रक्ताने माकलेले बाळ दिसले. अश्यात काही नागरिकांनी त्याला सौन्दड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविले. अश्यात बाळाचे वजन २.५० किलो ग्राम अश्ल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी स्थानिक पोलिसांना या बाबद माहिती दिली आहे. या घटने मुळे गावात विविध चर्चांना उधान आले आहे. जिवंत नवजात बाळाला फेकून देणारे क्रूर पालक कोण ? किवा कुणाच्या पापांचा हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना. यावर पुढे काय होते ते पाहणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *