News24 Today

Latest News in Hindi

शेळी चोर समजून केली काट्यांनी मारहाण सडक अर्जुनी तालुक्यातील घटना.

1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी , 1 सप्टेंबर 2022 – गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेळी चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे शेळी चोरीचा संशय घेऊन दोन युवकांना चोर समजून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्हातील अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी गावात घडली आहे. खडकी बाम्हनी गावात मागील 10 दिवसांपासून शेळ्या चोरीच्या घटना सुरू असल्याने गावकरी दहशतीमध्ये आहे. त्यामुळे गावात अनोळखी व्यक्ती आला की त्यांची विचारपूस केली जात असते.

मात्र बुधवारी गावात दोन अनोळखी तरुण आले होते. गावकऱ्यांनी या तरुणाला रोखले आणि विचारपूस सुरू कली. या तरुणांनी आपण कुठून आलो याची माहिती दिली. पण, गावकऱ्यांचं त्यावर समाधान झालं नाही.

या तरुणींनी योग्य उत्तर न दिल्यामुळे गावकऱ्यांनी हेचं दोघे शेळी चोर असल्याच्या संशय बळवला. त्यामुळे गावातील लोकांनी या दोन्ही तरुणांना लाठ्या काठ्यानी मारहाण केली. या तरुणांनी गयावया केली पण गावकऱ्यांचा जमाव या तरुणांचं ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. भर रस्त्यात या तरुणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनी या दोन्ही तरुणांना डूग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आता या मारहाणीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असल्याने याची चौकशी पोलीस करीत आहेत.

अशी माहिती news 18 lokmat नी प्रसारित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *