News24 Today

Latest News in Hindi

कोहमारा येथील हॉटेल वैष्णवी मध्ये रुद्र सागर साप्ताहिक न्यूज पेपर आणि महाराष्ट्र केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्पमित्रांचा सत्कार सोहळा संपन्न.

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी , 06 ऑगस्ट 2022- राष्ट्रीय हिंदी बहुभाषिक साप्ताहिक न्यूज पेपर रुद्रसागर च्या द्वितीय आणि महाराष्ट्र केसरी च्या चौथा वर्धापन दिन कार्यक्रम आज दिनांक 6ऑगस्ट रोज शनिवारला कोहमारा येथील हॉटेल वैष्णवी सभागृहात पार पडला.

याप्रसंगी वर्धापन दिन आणि संपादक बबलू मारवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्प मित्रांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी रुद्रसागर न्यूज पेपर चे विमोचन कार्यक्रम पार पडले. यावेळी सर्पमित्र हर्षद सेलोकर, पप्पी इंगळे,अनिरुद्ध पारधी, शुभम कडव,पराग लाडे,राज खोब्रागडे, या सर्पमित्रांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्पमित्र अनिरुद्ध पारधी यांनी सापांविषयी माहिती देताना साप पकडताना येणाऱ्या अडचणी, सर्पमित्रांच्या मागण्या, सर्पदंश आणि त्यावर उपचार, अंधश्रद्धा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाच्या सडक अर्जुनी तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी वेद परसोडकर यांची नियुक्ती करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिप सदस्य निशाताई तोडासे, पंचायत समिती सदस्या वर्षाताई शहारे, उपासभापती शालिंदर कापगते, सरपंच दिनेश हुकरे, संपादक डॉ.सुशील लाडे, वच्छलाबाई मारवाडे यांनी संपादक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उपास्थिताना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रोशन बडोले, कृषी सहाय्यक राजशेखर राणे, चरणदासजी शहारे, शुभम जनबंधू, रंजनाताई भोई,सौ रोशनी मारवाडे, उषाताई राऊत, जयपालजी मारवाडे,पत्रकार आकाश बावनकुळे,हेमंत इरले, वेद परसोडकर, गंगाधरजी मारवाडे,संदीप कठाने, रोहित कठाने,कविता कठाने, वंदना मारवाडे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन पत्रकार अश्लेष माडे यांनी केले तर आभार आयोजक संपादक बबलू मारवाडे यांनी मानले.

Ad

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *