सडक अर्जुनी ; सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार .
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी : तालुक्यातील बकी येथील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका 21 वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची घटना 24 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. लोकेश हिरालाल खोटेले (वय 21) असे आरोपीचे नाव आहे. सदर अल्पवयीन पीडित मुलगी ही गावातील हनुमान मंदिराजवळ खेळत असताना आरोपीने तीला फूस लावून गावातील तलावाच्या पाळीवर घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे कलम 376 अ ब भांदवी सहकलम 4,6,10,12 बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम सन 2012 सह कलम अजाजप्रका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. डी. बांबोळे करीत आहेत.