news24today

Latest News in Hindi

बिबट कातडी व खवले मांजर शिपले विक्री प्रकरणी 7 आरोपींना अटक.

1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी – विभागीय वन अधिकारी (दक्षता) नागपूर वनवृत्त नागपूर, नागपूर व गोंदिया वनविभागामार्फत संयुक्त कार्यवाहीचे वेळी सडक/अर्जुनी तालुक्यातील मौजा खजरी येथून वन्यप्राणी बिबट कातडी व खवले मांजर शिपले विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे अवयवांच्या विक्रि करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता व दिनांक २३.०७.२०२२ रोजी दुपारी ३.०० च्या सुमारास मौजा खजरी गांवात देवाण-घेवाण करण्याचे ठरविले होते. त्यानंतर विक्रिसाठी आलेले आरोपींना नागपूर येथील पथक व गोदिया वनविभागातील सडक/अर्जुनी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी मौजा खजरी गांवात अटक करून त्यांचेकडून वन्यप्राणी बिबटाची कातडी व खवल्या मांजराचे शिंपले व तिन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली.

सदर प्रकरणात एकूण ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेतलेले आरोपी १) निखिल निलकंठ अगडे, वय ३५ वर्षे रा. पो. ता. गोरेगाव जि. गोदिया, २) श्री. कैलाश काशिराम घुमके, वय २४ वर्षे रा. पो. खजरी ता. सडक/अर्जुनी जि. गोंदिया ३) श्री. हेमराज ओंकार उके, वय ३२ वर्षे रा. मोहाडी (चोपा) ता. गोरेगांव जि. गोंदिया ४) श्री. मिथुन छविलाल घुमके, वय २८ वर्षे रा. पो. खजरी ता. सडक/अर्जुनी जि. गोंदिया. ५) श्री. मनोज नारद मानकर, वय २२ वर्षे रा.पो.ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया ६) श्री. नरेश दामा ठाकरे, वय ३९ वर्षे रा. थाडेझरी पो, कोसमतोंडी ता.. सडक / अर्जुनी जि. गोंदिया. ७) श्री. मनोज दामा ठाकरे, वय ३५ वर्षे रा. थाडेझरी पो. कोसमतोंडी ता. सडक/अर्जुनी जि.
गोंदिया असे असून त्यांचेकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

१)वन्यप्राणी बिबट कातडी १ नग

२)खवले मांजराचे शिंपले ३.५ कि. ग्रॅ.

३) मोटार सायकल ३ नग.

वरीलप्रमाणे आरोपी असून आरोपी विरुद्ध भारतीय वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये श्री. प्रितमसिंग गुलाबसिंग कोडापे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) नागपूर श्री. एन. जी. चांदेवार सहायक वनसंरक्षक (जंकास २) श्री. प्रदिप पाटिल, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग, गोंदिया, श्री. लहु ठोकड, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी ( वन्यजिव) व चमु तसेच श्री. सुरेश एम. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी तसेच वनविभागतील क्षेत्रीय कर्मचारी यांनी संयुक्तपणे आरोपींना जेरबंद करून माल हस्तगत करून यशस्वी कार्यवाही केली आहे. व पुढील तपास मा. श्री. कुलराजसिंग, उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Ad
Àd

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *