आश्रम शाळा शेंडा येथे नक्षल दमण सप्ताह मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
1 min read
गोंदिया, सडक अर्जुनी – सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा येथील पोस्ट बेसिक शासकीय आश्रम शाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत आज दिनांक 23 जुलै 2022 रोजी देवरी पोलीस ठाणे अंतर्गत नक्षल दमण सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.नक्षल विरोधी जनमत व जागृती होऊन पोलीस विभागात सहभागी होण्याच्या दृष्टीने आदिवासी विद्यार्थी व पालक यांच्यात सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने देवरी पोलीस विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन होते होत आहे.यानिमित्त विकास व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय आश्रम शाळाशासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एच. के. किरणापुरे आणि त्यांचे शिक्षक वृंदानी महत्वाची भूमिका निभावली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष. देवरी पोलीस पोलीस स्टेशनचे. ए. पी .आय. एन.के.घाडगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना रॅली चे उद्देश समजावून सांगितले.विद्यार्थ्यांच्या रॅली सोबत पोलीस हवालदार झेड .पी .मडावी, एन .एच. गायधने, एन. ए. बोहरे, जी. एस .मेंढे, आणि कमल चव्हाण उपस्थित होते.

