जि.प. कनिष्ठ महाविद्यालय स/अर्जुनी आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींचे शासकीय निवासी शाळा डव्वा येथे सर्प जनजागृती चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी- तालुक्यात सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी यांच्यातर्फे 19 जुलै 2022 रोजी सदर कार्यक्रम घेण्यात आले. सविस्तर असे की पावसाळ्याच्या सुरुवातीला साप दिसण्याचे प्रमाण वाढलेले असते तसेच सर्पदंशाने मुत्यू झालेल्यांचे प्रमाण सुद्धा बघायला मिळते. या घटनेत शालेय वि्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असतो.
त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन पर स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सर्पमित्र सदस्य उमेश उदापूरे यांनी सापाचे महत्व, सापांचे प्रकार, कायदे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आणि सर्पदंश झाल्यास काय करावे या विषयावर विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमात प्रादेशिक वनविभाग कोहमारा चे अधिकारी तरुण बेलकर ,एस. यु. चौहान, सृष्टी फाउंडेशन चे मोहित नंदागवळी, हर्ष राऊत, शुभम नंदेश्वर, राज खोब्रागडे, हिना भेंडारकर तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम सर, नेमीचांद गिरहेपंजे, डव्वा शाळेचे मुख्याध्यापिका कू. संध्या दहिवले मॅडम, शिक्षक मुन्नाभाई नंदा गवळी, के. डी. अंबुले, पी. एच. ढवळे, व्ही. एम. बावबावरे, डी. एम. सोनवाणे, सहकारी आवेश राऊत, आदी उपस्थित होते.