News24 Today

Latest News in Hindi

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सडक अर्जुनी तसेच एच अँड टी जुनियर कॉलेज सडक अर्जुनी येथे सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले.

1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी – तालुक्यातील सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी यांच्यातर्फे 22 जुलै 2022 रोजी सदर कार्यक्रम घेण्यात आले. सविस्तर असे की पावसाळ्याच्या सुरुवातीला साप दिसण्याचे प्रमाण वाढलेले असते तसेच सर्पदंशाने मुत्यू झालेल्यांचे प्रमाण सुद्धा बघायला मिळते. या घटनेत शालेय वि्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असतो. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन पर स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे सर्पमित्र सदस्य शुभम नंदेश्वर यांनी सापाचे पर्यावरणातील महत्व, सापांचे प्रकार, कायदे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आणि सर्पदंश झाल्यास काय करावे या विषयावर विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमात प्रादेशिक वनविभाग कोहमारा चे अधिकारी आनंद बंसोड सर, सृष्टी फाउंडेशन चे मोहित नंदागवळी, हर्ष राऊत, राज खोब्रागडे, हर्षद शेलोकर, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा येथील विद्यार्थी हिना भेंडारकर, उमेश उदापुरे, उर्वशी मोहुरले, रागिनी कन्नमवार, टिना डोंगरवार, तसेच एच अँड टी शाळेचे मुख्याध्यापक कुरेशी सर, रत्नाकर करंडे सर, रंगारी सर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील शिक्षक चोपकर सर, साठवणे मॅडम, योगेश मसराम सर आदी उपस्थित होते.

Ad
Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *