पाच सापांना जीवनदान देऊन सडक अर्जुनी येथे जागतिक सर्प दिवस साजरा करण्यात आला.
1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी – सडक अर्जुनी तालुक्यातील सृष्टी फाउंडेशन चे सदस्यांनी सडक अर्जुनी पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले ग्राम दुंदा पांढरी येथे जाऊन नाग सापाचा जोडा पकडला. सापाची लांबी अंदाजे पाच फूट असून ते पूर्णतः विकसित झालेले होते. सदर साप अत्यंत विषारी असून ते त्यांच्या मिलनाच्या काळात होते. तसेच वडेगाव येथून एक धामण साप तर सडक अर्जुनी येथून दोन कवड्या साप असे एकूण पाचही सापांना नवेगाव नागझिरा व्याग्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या वन्यजीव संरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले.
