गोंदिया तालुक्यातील कारंजा भदूटोला येथील दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.
1 min read

गोंदिया- दिनांक 9/07/2022 रोजी गोंदिया तालुक्यातील ग्राम कारंजा भदृटोला येथे राहणाऱ्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पवन विजय गाते हा विद्यार्थी तिसऱ्या वर्गात शिकत होता तसेच वंश उपराडे हा विद्यार्थी पहिल्या वर्गात शिकत होता.
ही सदर घटना 4 वाजेच्या सुमारास घडली असावी असा प्रारंभिक अंदाज आहे.6 विधार्धी ग्राऊंडवर खेळण्याकरिता गेले होते .
त्यांनतर भदृटोला पिंडकेपार जवळील खदानामध्ये आंघोळ करण्याकरिता गेले होते 2 विद्यार्थी पाण्यात खुदले आणि त्यांचा पाय चिखलात फसल्यामुळे निघू सकले नाही त्यामुळे ही सदर घटना घडली.
त्यानंतर चार विद्यार्थी यांनी आजू बाजूला त्या दोन मुलांना वाचवण्याकरिता प्रयत्न केला व याबाबत आठव्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांना माहिती दिली. पण तोपर्यंत सदर घटना घडून गेली.
त्यानंतर गावात माहिती होताच गावातील नागरिक जमा झाले.
