ग्रामपंचायत कोहमारा तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या समस्या तात्काळ सोडवा…
1 min readग्रामपंचायत कोहमारा तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या समस्या तात्काळ सोडवा.
• गटविकास अधिकाऱ्यांना कोहमारा येथील युवकांचे निवेदन
गोंदिया , सडक अर्जुनी, 08 जुलै 2022- सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि अशातही तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतीकडे वीज वितरण विभागाची थकबाकी असल्याने गावातील विजेचे खांब शोभेची वस्तू बनली आहे विद्युत खांबावरील लाईट बंद असल्याने गावात सगळीकडे अंधार पसरलेला असतो आणि अश्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेक सरपटणारे प्राणी रस्त्यावर निघत असतात.
त्यामुळे कुठलाही मोठा धोका नाकारता येत नाही. आधीच मागील दोन वर्षापासून आपण कोरोना महामारी शी लढत आहोत मात्र त्या महामारी पासून अद्याप काहीच शिकलेलो नाही हे लक्षात येते. कारण,अजूनही बऱ्याच गावात नाल्यांची सफाई, कचरा निचरा झाला नसल्याने अस्वछतेमुळे अनेक रोगांना निमंत्रण दिले जात आहे.तसेच पावसाळा सुरु झाल्याने, अनेक ठिकाणी गढूळ पाणी येतो. त्यामुळे तुरटी, ब्लिचिंग पावडर वैगरे टाकून पाणी सुद्ध केल्या जाते. मात्र तसेही होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
अशा अनेक समस्या अजूनही तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत अंतर्गत बघायला मिळत आहेत. तरीपण नागरिकांना होणाऱ्या असुविधा, समस्या याकडे त्वरित लक्ष देऊन, संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी, अधिकारी यांना तात्काळ सूचना देऊन नागरिकांना होणाऱ्या समस्या सोडवाव्या अशा मागणीचे निवेदन कोहमारा येथील युवकांनी आज दि.8 जुलै रोज शुक्रवारला मा. उपसभापती शालिंदरजी कापगते पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या समक्ष मा. डॉ. श्रीकांत वाघाये गटविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांना दिले आहे.
यावेळी निवेदन देताना कोहमारा येथील कवी तथा पत्रकार अश्लेष माडे, प्रवीण उके, पदम मेश्राम, पत्रकार वेद परसोडकर, गणेश शहारे, महेश शहारे, सुनील मडावी,अनमोल निखुरे,बबन बडोले, शैलेश लाडे आदी युवक उपस्थित होते.