News24 Today

Latest News in Hindi

शिंदीपार येथे गोठ्यात शिरला बिबट्या , शेळी सह कोंबड्या केल्या फस्त , दोन तासाच्या प्रयत्ना नंतर बिबट्या पिंजऱ्यात.

1 min read

गोंदिया : शिंदीपार येथील शेतकरी सुरेश शंकर कापगते यांच्या पडक्या गोठ्यात जनावरे बांधलेली होती. म्हशी, गायी, शेळ्या आणि कोंबड्या वेगवेगळ्या रूममध्ये होत्या. रात्री अंदाजे दहा वाजता बिबट्या जनावरांच्या गोठ्यात खिडकीतून शिरला. एका शेळीला ठार केले. शेळीचा आवाज येताच शेतकरी सुरेश कापगते हे गोठ्यात पाहण्यासाठी गेले. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. येवढ्यात शेतकऱ्याने चतुराई केली. समयसुचकतेचा वापर केला. शेतकऱ्यांनी वेळीच दार लावत बिबट्याला आतमध्ये कोंबून ठेवले. याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने रात्रीच नवेगावबांध ,

येथील रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केला.

दोन तासांच्या प्रयत्नानंतर अटक

जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत शिंदीपार येते. येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट शिरला. बिबट्याने गोठ्यातील 5 शेळ्या आणि 5 कोंबड्या फस्त केल्या आहेत. दोन तासांच्या अथक परिश्रमाने बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. यामुळं शेतकऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेळ्या, कोंबड्या फस्त झाल्यामुळं झालेली भरपाई कशी मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकलाय.

नेमकं काय घडलं

बिबट्या शिंदीपार गावात शिरला. त्यानंतर त्याने खिडकीतून गोठ्यात प्रवेश केला. गोठ्यात त्याने शेळी फस्त केली. कोंबड्याही खाल्या. तो आतमध्ये असल्यानं शेतकऱ्यांनी त्याला डांबून ठेवले. त्यानंत वनविभागाला कळविण्यात आले. नवेगावबांध येथून रिस्क्यू टीम आली. या टिमनं बिबट्याला अटक करण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात तो अखेर अडकला. यासाठी दोन तास प्रयत्न करावा लागला. बिबट्याने हल्ला केल्यामुळं गावकरी भयभीत झाले होते. परंतु, त्याला अटक केल्यानं त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पण, याला पुन्हा वनविभागानं जंगलात सोडलं तर तो गावात परत येणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *