बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सडक/अर्जुनी येथे युवा गटांचे उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत परिचय व मुलाखत सत्र आयोजित करण्यात आले.
1 min readगोंदिया, सडक/अर्जुनी, 14 जुन 2022 : डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( एमसीइडी ) गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सडक/अर्जुनी येथे युवा गटांचे उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत परिचय व मुलाखत सत्र आयोजित केले होते .
अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवतीचे स्वयंसहाय्य युवा गटासाठी एक महीना कालावधीच्या ( अनिवासी ) निशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन बार्टी व एमसीईडीच्या वतीने जुन महिन्यात करण्यात आले आहे . या अनुषंगाने 14 जून रोजी मुलाखती घेण्यात आल्या सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन आणि माल्यार्पण करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यावेळी बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मा. शारदा कड़स्कर यांनी युवकांना मार्गदर्शन केले एमसीडीचे प्रकल्प अधिकारी मा. संदीप जाने यांनी प्रशिक्षण विषयी मार्गदर्शन केले समतादूत संदेश ऊके, महेंद्र कटबरये, राजरत्न मेश्राम, साजन वासनिक, समन्वयक शेखर मेश्राम उपस्थित होते.
यादरम्यान होणाऱ्या एक महिना कालावधीच्या या प्रशिक्षणात उद्योग उभारणी , उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास , उद्योगांना भेटी , उद्योगासाठी विविध नोंदणी व परवाने स्टार्ट जिल्हा अप इंडिया , मुद्रा योजना , उद्योग निवड प्रक्रिया , स्टॅन्ड अप इंडिया , सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण , डिजिटल मार्केटिंग , विविध क्षेत्रातील उद्योग संधी , शासकीय व निमशासकीय महामंडळा चे कर्ज , प्रकल्प विषयी योजनांची माहिती , कंपनी नोंदणी , महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण , मशिनरी व कृषी योजनांची माहिती यावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे .
आजच्या उद्योजकीय परिचय मेळाव्यात सुत्र संचालन समतादूत संदेश ऊके यांनी केले प्रस्ताविक समतादूत महेन्द्र कटबर्ये तर आभार समतादूत राजरत्न मेश्राम यांनी केले.