सावंगी; अंधश्रद्धेने घेतला आणखी एकाचा बळी.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी – ग्राम सावंगी बामणी येथील प्रितेश मधुकर बंसोड वय २९ वर्षे हे दिनांक 1 जून 2022 रोजी आपल्या किराणा दुकानात काम करत असताना दुपारी दोनच्या दरम्यान त्याला सर्पदंश झाला. सदर दंश होताच आपल्या आईला ही घटना सांगितली आणि गावठी औषध खायला कोहळीटोला येथे गेले. गावठी औषध उपचार झाल्यानंतर घरी येऊन आंघोळ केली त्यानंतर अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखापत सुरू झाली त्यावेळेस दोन अडीच तास होऊन गेले होते. नंतर गाडीवरून सडक अर्जुनी ला येताना असतांना त्यांनी कोहमाऱ्यात श्वास सोडला. ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे त्यांची नोंद घेण्यात आली आणि सकाळपर्यंत पोस्टमार्टम साठी शव ठेवण्यात आला.
गोंदिया जिल्हा सर्प संवर्धन समितीचे सदस्य तसेच सृष्टी फाऊंडेशन सडक अर्जुनी चे पदाधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन सापाचा शोध घेतला पण खूप उशीर झाल्यामुळे सर्प निघून गेला. सर्पदंश झालेल्या खुणा पाहता, साप मण्यार (कॉमन क्रेट) जातीचा असल्याचा अंदाज आहे. हा साप नागा पेक्षा विषारी असल्याचे सांगितल्या जाते.
