सौंदड रेल टोळी येथे बिबट्याची दहशत.
1 min readगोंदिया,सडक/अर्जुनी, दिंनाक : 23 मे 2022 : तालु्क्यातील ग्राम सौंदड येथील रेल्वेटोली परिसरात 21 मे च्या सायंकाळी एका वेक्तीच्या घरामागे बिबट दिसल्याने गावात एकाच खळबळ उडाली.
गावकरी भीती मध्ये आहेत, नवेगाबांध आणि नागझिरा राखीव व्याग्र प्रकल्प लगत शेत जमीन आणि गाव असलेल्या भागात नेहमी वण्यजीवांचा वावर पाहण्यासाठी मिळते अश्यात सध्या रख राखता उन्हाळा असल्याने पीण्याच्या पाण्यासाठी आणि शिकारीच्या शोधात वन्य प्राणी गावाच्या दिशेने प्रवास करतात.
त्या मुळे भुकेला वन्य प्राणी शेतमालाची आणि शेतकऱ्यांच्या जनावरांची नेहमी शिकार करतात, 21 मे रोजी च्या सायंकाळी भावराव ब्राम्हनकर यांच्या घरा मागील वाळीत टाक्यातील पाणी पिताने त्यांच्या मुलाने बिबट्या ला पाहिल्याचे सांगितले आहे.
त्या मुळे गावात खळबळ माजली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तात्काळ घनास्थळी भेट दिली, नागरिकांचा कोहकाटा जमला होता, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले काही वेळानंतर बीबट आपणच निघून गेला पण आमचे कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत सदर ठिकाणी गस्तीवर होते.
बीबट या परिसरात नेहमीच वावरत असल्याने गावकरी धास्तावले आहेत, करीता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मगणी गावकरी करीत आहे.