नरेगा अंतर्गत ग्राम मुंडीपार/ई , शेंडा, राजगुडा येथे १.५० कोटी चे रस्त्या बांधकामाचा भूमिपूजन मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते संपन्न.
1 min read
नरेगा अंतर्गत ग्राम मुंडीपार/ई , शेंडा, राजगुडा येथे १.५० कोटी चे रस्त्या बांधकामाचा भूमिपूजन मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विशेष निधीमधून अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदार संघात एकूण ९ कोटीची ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा विशेष प्रयत्नाने मंजूर झाली असून त्यापैकी प्रत्येकी रु. ५० लक्षची सिमेंट रस्त्याची कामे मुंडिपार /ई, शेंडा, राजगुडा यातील ग्रामपंचायतीत असून त्यांचे भूमीपुजन दिनांक १७/०५/२०२२ रोजी आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सुधाताई रहांगडाले जिल्हा परिषद सदस्या, डॉ. अविनाश काशिवार तालुका अध्यक्ष राकॉप, अल्लाउद्दीन राजानी पं.स. सदस्य, डी.यु.रहांगडाले, मोहन सुरसाऊत सरपंच राजगुडा, धनराज येडे सरपंच मुंडीपार, मोहन बोरकर सरपंच शेंडा, प्रीतमलाल येडे, युवराज राऊत,सुरेश पटले,नंदराम कुसराम, मोग्रज मरस्कोले, सिद्धार्थ कुसराम, पुष्पाबाई राऊत ,मधुकर वाढई डायमंड डोंगरे, आनंद इडपाटे, वच्छलाबाई मरस्कोले उपसरपंच शेंडा, छायाताई टेकाम सरपंच रेंगेपार, रामदास चिचाम, विनोद पंधरे, नेहरू परतेकी, रजनीताई दसरीया, अमन मेश्राम, अनिनाश मेश्राम, किरण ताई मला बी नरेश मेश्राम, सुमित खोब्रागडे, उमेश उईके, मीनाताई घासले, मध्ये उर्मिलाताई घासले, सुग्रताबाई इडपाते, तसेच ग्रामस्थ उपस्थित होत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वागिण विकास साधण्यासाठी ग्राम पंचायतींनी पुढाकार घ्यावा . नरेगाच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे सहज करता येतात. सदर योजने अंतर्गत कामामुळे विकासाला गती मिळते, त्याचप्रमाणे गावातील मजूरांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. ७० ग्रामपंचायतींनी प्रत्येकी २ कोटीच नियोजन केल्यास नरेगाच्या माध्यमातून १४० कोटीची कामे करता येतील व कामे करून गावाचा विकासात्मक कायापालट करणे सहज शक्य असल्याचे सांघितले.
नंतर ग्राम पंचायत सभागृहात ग्रामस्थांशी संवाद साधले,गावाच्या विकासात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे . गावच्या सरपंचानी गावाच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले तर निधीची कमतरता भासणार नाही . विविध माध्यमातून विकास निधी मिळतो . काम करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे . सबब नरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखडा तयार करावा अशी सूचना केली आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केली.
