ग्राम वांगी/ चिंगी येथील पोलिस पाटलाला पदावरून बडतर्फ करा गावकऱ्यांचे निवेदन.
1 min readगोंदिया,सडक /अर्जुनी, दिंनाक : 18 मे 2022 : तालुक्यातील ग्राम खोबा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम वांगी/ चिंगी येथील पोलिस पाटलाला पदावरून बडतर्फ करण्यात यावा करीता गावकऱ्यांनी अर्जुनी मोर येथील अतिरिक्त पदांवर असलेल्या नायब तहसीलदार यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांना लेखी स्वरूपाचे आज 17 मे रोजी निवेदन दीले आहे, 09 एप्रिल 2022 रोजी चिंगी येथील पोलिस पाटील संजय रामकृष्ण रामटेके यांचेवर 354 आणि पोस्को च्या कलमा अंतर्गत गुन्हा साकोली पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आला आहे, हा गुन्हा अल्पवीन मुलीवर लेंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नोंद करण्यात आला होता, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, निवेदन देतेवेळी गावातील नागरिक उपस्थित होते, ग्राम पंचायत खोबा येथील मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आले आहे.