कोहमारा टी पॉइंट झाले अपघाताचे ठिकाण, महामार्ग पोलीस मालसुतो अभियानात वेस्त!!
1 min readगोंदिया, सडक / अर्जुनी, दींनाक : 18 मे 2022 : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर मोठ्या प्रमाणावर अवजाड वाहने नेहमी उभी असतात, त्या मुळे अपघाताची भीती बळावली आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 हा मार्ग नागपूर वरून रायपूर कडे जाते, अश्यात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा हा याच मार्गावरील मुख्य टी पॉईंट आहे.
या ठिकाणावरून गोंदिया कडे जाणारे आणि येणारे वाहने मोठ्या प्रमाणावर चालतात.
अश्यात मुख्य टी पॉईंट वर ट्रॅक उभे असतात त्यातच याच ठिकाणी बस देखील थांबतात अश्यात बस थांबण्यासाठी पूरक जागा नसल्याने ही वाहने मुख्य टी पॉईंट वर थांबतात, दृष्या मध्ये आपण पाहू शकता, अश्यात गोंदिया कडून येणारे वाहन देवरी मार्गावर उभे असल्याने भरधाव वेगात येणारे वाहनांमुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अश्यातच याच परिसरात महामार्ग विभागाचे पोलीस कर्मचारी नेहमीच समोरील हॉटेल मध्ये बसलेले पाहण्यासाठी मिळतात, मात्र मुख्य मार्गावर थांबनाऱ्या वाहनावर कोणतीही कारवाई केली जात नाही अशी नागरिकात चर्चा आहे.
अपघातवार नियंत्रण करणारी यंत्रणा सुस्त असल्याने अपघाताचे परिणाम वाढल्याचे दिसून येते, मात्र पोलिस प्रशासन लहान वाहनाचे कागद पत्र तपासून फाईन फाडण्यासाठी नेहमी तत्पर असते एकंदरीत माल सुतो अभियानात वेस्त अशल्याची चर्चा आहे, या पूर्वी महामार्ग पोलीस विभागात होत असलेल्या अवैध वसुली आणि भ्रष्टचार बाबद चे वृत्त महाराष्ट्र केसरी न्यूज ने प्रकाशित केले होते, त्यावर महामार्ग विभागाचे मुंबई येथील पोलिस महासंचालक यांनी तब्बल सहा महिने साठी विदर्भातील मुख्य मार्गावरील वाहनावर कारवाई न करण्याचे आदेश दीले होते अशी देखील चर्चा आहे.
मात्र पुन्हा वाहनावर दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिक संताप वेक्त करीत आहेत.
वसुली मध्ये गुंतलेले अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षे कडे लक्ष देतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, जनतेकडून हा गंभीर विषय विचारला जात आहे, गेली अनेक वर्षे राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असली तरी देवरी कडे जाणाऱ्या मार्गावर अद्यापही प्रवासी निवारा बांधण्यात आलेला नाही, परिणामी प्रवाश्यांना भर उन्हात झाडाखाली किंवा पान टपरी च्या आडोष्याला उभे राहून वाहनाची वाट पाहावी लागते.
स्थानिक लोप्रतिनिधींनी जनतेच्या गंभीर समस्या कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, मुख्य मार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई ची मागणी होत आहे, तर प्रवासी निवाऱ्याची देखील मागणी होत आहे.