सौंदड येथील तो अवलिया दरवर्षी पक्ष्यांसाठी दाना पाण्याची करतोय सोय.
1 min readगोंदिया,सडक/अर्जुनी, दिंनाक : 18 मे 2022 :तालुक्यातील ग्राम सौंदड येथील सचिन हिरालाल हटकर नामक हा माळी समाजातील तरुण दरवर्षी पक्ष्यांसाठी दाना पाण्याची सोय करतोय त्यासाठी आवश्यक असलेली मातीची टाकाऊ भांडी जवळच्या मामा तलावातून आणतोय, दरवर्षी गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन आणि गौरी विसर्जन वेळी दिवे लावण्याच्या कामात वापरण्यात आलेली भांडी, तलावात विसर्जन केलेली जातात.
हेच टाकाऊ मातीच साहित्य पक्ष्यांच्या कामात येतात सौंदड हिरबाजी स्टेडियम परिसरातील मार्गावर असलेल्या झाडांवर पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी आणि तांदूळ सह बारीक गहू चे तुकडे मातीच्या भांड्यात भरून झाडांवर पक्ष्यांसाठी सोय केली आहे, याला छंद म्हणावं की पक्ष्यांप्रती दया तो प्रतेकाच्या विचार सरणीवर अवलंबून असते.
मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात कडाक्याची 45 डिग्री अशी गर्मी असते अश्यात पसू पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत असतात, अश्या भयावह असलेल्या गर्मित अनेक नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवावे असे पक्षी प्रेमींनी आवाहन केले आहे.