News24 Today

Latest News in Hindi

सावंगी येथे अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्पर वर दंडात्मक कारवाई.

1 min read

सडक अर्जुनी – तालुक्यातील तलाढी साजा क्र.७ मौजा सावंगी येथे दि.२१एप्रिल२०२२ ला रात्री ११.५२ वाजेदरम्यान अवैध रेतीची वाहतूक करित असलेला टिप्पर उपविभागीय अधिकारी सुर्यवंशी अर्जुनी मोरगाव यांनी बल्लाड ढाब्याजवळ पकडले.वाहन चालक संदिप वाघाडे सौंदड यांचे टिप्पर क्र.एमएच -३५एजे-१६८५ या क्रमांकाचे टिप्पर विनापरवाना अवैध ५ ब्रास रेती या गौण खनिजांची वाहतूक करित असतांना आढळून आल्याने गस्तीवर असतांनी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव व पथक यांनी पकडून जप्तीची कारवाई करून तहसिल कार्यालय सडक अर्जुनी येथे जमा केले . सदर अवैध रेती वाहतूक करणारे वाहन दिपक वसंता गहाणे फुटाळा यांचे मालकीचे असून वाहन जप्त करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून तीन लाख एकोनविस हजार चारशे पंचेविस रुपये दंड आकारण्यात आला आहे.
यापूर्वी दिपक वसंता गहाणे फुटाळा यांचेवर अवैध रेती वाहतूक प्रकरणात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत चारवेळा दंड ठोठावण्यात आला आहे.वास्तविक या प्रकरना मधे FIR दर्ज व्हायला हवे होते परंतू दिपक वसंता गहाणे यांनी अजूनपर्यंत त्या दंडाची रक्कम जमा केली नसल्याचे समजते. तहसिल कार्यालयाकडून दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.पण त्या नोटीसाची अवहेलना करून आकारण्यात आलेला दंड अजूनही भरण्यात आला नाही.
आजही सर्रासपणे सौंदड गावातून अवैध रेतीची वाहतूक खुलेआम सुरू आहे.
उपविभागिय अधिकारी यांनी सावंगी येथे २१ एप्रिल ला अवैध रेतीचा टिप्पर पकडून जप्त करून दंडात्मक कारवाई करून दंड ठोठावला आहे.
तरीपण रेती तस्कर खुलेआम सौंदड गावातून अवैध रेतीची वाहतूक करित आहेत. या रेती तस्करांना अधिका-यांची भिती नसून सर्रास पणे अवैध रेतीची वाहतूक करित आहेत.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *