कोहमारा येथे उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा.
1 min read
दि.16 एप्रिल रोज शनिवारला तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गवरील ग्राम कोहमारा येथील वार्ड क्र एक मधील हनुमान मंदिरात युवकांच्या पुढाकाराने व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात घट प्रज्वलीत करून आज दि 16 एप्रिल रोज शनिवारला दहीकाला फोडण्यात आला. तसेच समस्त भाविकभक्तांना महप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोहमारा येथील समस्त युवक वर्ग, महिला व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
