सड़क अर्जूनी येथे दरोड़ा घालणारे आंतरराज्यीय टोळी चे २ कुख्यात आरोपीं डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात.
1 min readगोंदिया,सड़क अर्जूनी, दिनांक १३ एप्रिल २०२२ : दिनांक ०३ एप्रिल रोजी सडक अर्जुनी येथे राहणारे फिर्यादी मनीष गुरुप्रसाद गुप्ता वय ५२ वर्ष वार्ड क्र.१७ प्रगती कॉलनी आर. के. पेट्रोल पंपासमोर, सडक अर्जुनी जि. गोंदिया, नागपुर येथुन परिवारासह स्विप्ट डिझायर गाडीने त्यांचे हे सडक अर्जुनी येथील घरासमोर परत आले असता त्यांना तेव्हा दोन इसम हातात रॉड घेवून त्याचे घराचे पोर्चमध्ये दिसले, असता त्यांना फिर्यादीने त्यांना हटकले असता फियांदीचे घरामधून आणखी पाच इसम बाहेर आले अशा एकूण सात इसमानी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने फियादीच्या गाडीच्या काचा फोडुन गाड़ीचे नुकसान करून गाडीत बसलेल्या फिर्यादीची पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागीने रोख रक्कम व मोबाईल जबरजस्तीने हिसकावून घेवून गेले.
तसेच फिर्यादीने घरात जावून पाहणी केली असता अनोळखी चोरट्यांनी समोरील दरवाज्याचा लॉक तोडून आत प्रवेश करून बेडरुममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाईल एकूण किमती ३ ,८४,०००/- रु चा मुद्दे माल चोरून नेले तसेच मोहल्यातील राहणारे श्रीमती पुष्पकला पुरुषोत्तम बोरकर वय ५६ वर्ष यांच्या घराचा समारोल दरवाज्याचा तोडून आत प्रवेश करून एकुण किमती २,१४,५००/-रु. मुद्देमाल तसेच धनराज शंकर ठहारे वय ३८ वर्ष पांच्या घराचा समोरील दरवाज्याचा इंटरलॉक तोडून आत प्रवेश करून एकूण किमती १,०८,५००/ रू चा माल असा एकूण ७०७,०००/- रु. चा वरील मुद्देमाल चोरून नेल्याचे फियांदीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा क्रमांक ६६/२०२२ कलम ३९५ , ४५७ , ३८० भादवि अन्वये दाखल करून सदर गुन्हयाचा तपास सपोनि पांढरे , पो.स्टे. डुगगीपार त्यांना सोपविण्यात आले.
सदर गुन्हयाची माहीती मिळताच विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोदिया यांनी तात्काळ डूग्गीपार येथे जाऊन घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचे अनुषंगाने तपासाबाबत योग्य मार्गदर्शन सुचना दिल्या व अज्ञात आरोपीचे शोध घेणेकरीता वेगवेगळे पथक तयार करणेबाबत निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना विश्वसनिय सुत्राकडून गोपनिय माहीती मिळाली की सदर दरोडा करणारी टोळी ही मौजा बरडीया जिल्हा निमच मध्यप्रदेश येथील आहेत. पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांनी सदर मिळालेल्या माहीतीवरून सदर आरोपीचे शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विजय शिंदे, सपोनि राहुल पाटील, पोउपनि जिवन पाटील व गोंदिया शहर येथील पोउपनि श्री सेवाणे यांचे नेतृत्वात ३ पथके तयार करुन जिल्हा निमच म.प्र. येथे पाठविण्यात आली.
सदर तिन्ही पथक पानी पो.स्टे. मानसा जिल्हा निमच येथे स्थानिक पोलीसांचे मदतीने त्यांचे होतील दरोडा घालणारे टोळीचे संपूर्ण रेकॉर्ड तपासले असता मानसा पो.स्टे. हहातील हिस्ट्रोशिटर्स नामे अक्षय बछडा, सुनिल बैरागी व त्यांचे साथीदार अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी देशभरात वेगवेगळे ठिकाणी फिरत असतात व दरोडा सारखे गंभीर गुन्हे करतात -अशी माहीती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने गोंदिया जिल्हयाच्या पोलीस पथकाने स्थानिक पोलीसांचे मदतीने सापळा रचुन मोगा म. प्र. येथुन इसम नाम अक्षय बाछडा, सुनिल बैरागी त्या साथीदार यांचा राहण्याच्या ठाव ठिकाणा बाबत.
माहीती काढली परंतु इसम नाम अक्षय बाछडा व सुनिल बैरागी के पोलीसांना पाहून पळू लागले, पोलीस पथकांनी त्यांचा पाठलाग करून सदर दोन्ही इसम नाम अक्षय बाछडा व सुनिल बैरागी यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले व स्थानिक पोलीस स्टेशन मानसा जिल्हाह निमच येथे आणुन त्यांना विश्वासात घेऊन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार मिळून केल्याचे कबुली दिली.
त्यानुषंगाने त्यांचे इतर साथीदार यांचे शोध घेण्यात आले परंतु ते पसार झाले होते. दिनांक ११/०४/२०२२ रोजी सदर दोन्ही आरोपी २) अक्षय ऊर्फ भोला मुकेश बडा २१ वर्ष राडीयता मनासागि निमच म.प्र. २) सुनिल राजा वैरागी वय: ३३ वर्ष जतपुरा ता. मनासान मच मप्र यांना योग्य कायदेशिर कारवाई करून पुढील तपासकामी पो.स्टे. डुग्गीपार यांचे कडे देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संकेत देवळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बबन आव्हाड़ स्थागुशा पो.नि वांगडे, पो.स्टे. डुग्गीपार, सपोनि शिंदे, सपोनि राहुल पाटील, सपोनि पांढरे, पो.स्टे पार, पोउपनि जिवन पाटील, स्थागुशा, पोउपनि सैदाणे, गोदिया शहर, पोउपनि धूल, पोउपनि उघडे, पोउपनि यादव, सफी करपे, पोहचा ठाकरे, पोहवा मरे, पोना शेख, पोना इंद्रजित बिसेन, पोना सुबोध बिसेन, पोना रितेश लिल्हारे, पोना दिक्षीतकुमार दमाई, पोना पालादुरकर, पोना मारवाड़े, पोना बरख्या, पोना आशिष अग्नहोत्री, पोशि हंसराज भांडारकर, पो.शि अजय रहांगडाले, पो.शि बारेवार यांनी केली.