बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी.
1 min read
सडक अर्जूनी – कोसमतोंडी वनपरिक्षेत्र अंतर्गत मुंडीपार/ई.
येथील मोरेश्वर रामचंद्र वकेकार (वयू-४० वर्षे) या शेतकऱ्यावर मंगळवारी (ता.५) सकाळी ७:३० सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी किरकोळ जखमी झाला. शेतकरी गावाजवळ असलेल्या शेतावर गेला असता बिबट्याने हल्ला केला.यावेळी शेतकरी नालीमध्ये पडला.उठून घरी गेला.तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली.वनपरिक्षेत्राधिकारी सुनील मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोसमतोंडी चे वनरक्षक राम सिडोडे व वनरक्षक श्री भेलावे यांनी जखमी शेतकरी मोरेश्वर वकेकार याला गोंदियाच्या के.टी.एस. रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
