News24 Today

Latest News in Hindi

धक्कादायक! दारूडा ग्रामसेवक चक्क ग्राम सभेतच झोपला.

1 min read

विरशी ग्रामपंचायत येथील प्रकार, ग्रामसभा झाली रद्द, व्हिडिओ वायरल.
भंडारा दी. २८ मार्च : जिल्ह्याच्या साकोली तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत विरशी येथे आज अकरा वाजता सर्व ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांची मासिक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक हेमंत पब्बेवार साहेब चक्क दारू पिऊन आले, आणि दारूच्या नशेत आल्यामुळे कोणत्याही प्रकारचे कामकाज होऊ शकले नाही, कारण साहेब चक्क आपल्या खुर्चीवर लोळलेल्या अस्थेत ग्रामसभेत झोपल होते, ग्रामसेवक यांना उठविण्याचा प्रयत्न उपस्थित लोकांनी केला मात्र साहेब उठू शकले नाही.

त्यामुळे ग्रामसभा रद्द करावी लागली, सर्व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी बीडीओ आणि पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना भेटून घटना सांगितली, घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वायरल झाले आहेत, गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच : लीलाधर सोनवाणे, उपसरपंच : नंदलाल राऊत, सदस्य : रजनी दुर्गेश राऊत, माधुरी रेशीम लांजेवार, सरिता गहाने, पफुलता कोटांगले, वर्षा कापगते, भगवान लांजेवार, बाबुदाश पंधरे अशी नव लोकांची बॉडी आहे उद्या लेखी स्वरूपाची तक्रार वरिष्ठांना देण्याची माहिती आहे, या सर्व घटनेचे फोटो खुद्द उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काढले, दारुड्या ग्राम सेवकाची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *