पुणे ; ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग; इलेक्ट्रिक वाहनाच्या सुरक्षितेवर प्रश्न?
पुणे,वृत्तसेवा – इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. पुण्यात पार्किंगमध्ये असलेल्या ओला एस १ ईव्ही इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये बाइक जळून खाक झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत इलेक्ट्रिक कंपनीकडून ओला दुजोरा देण्यात आला आहे.
वाढते प्रदूषण आणि महागाई लक्षात घेता,सध्या बाजारात इलेक्ट्रिक बाइक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाहण्यास मिळत आहे. विविध कंपन्याच्या इलेक्ट्रिक बाइक बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील ओला एस १ ईव्ही कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइकला नागरिकाचा चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पण अशा घटनांमुळे या वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.
पुण्यातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास ओला एस १ईव्ही बाइक उभी होती. कोणाला काही समजण्याच्या आतच या इलेक्ट्रिक बाइक मधून हळूहळू धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अगदी काही मिनिटांत बाइकने पेट घेतला. या आगीमध्ये बाइक पूर्ण जळून खाक झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत ओला एस १ ईव्ही कंपनीकडून दुजोरा देण्यात आला आहे. बाइकला कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.