घाटबोरी/तेली शिवारातील चुलबंद नदीपात्रातून अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या विरुदध कारवाई.
1 min readगोंदिया पोलीस दलातर्फे अवैध धंदे करणाऱ्यावर निरंतर पोलीस कारवाई सुरु असून दिनांक २१/०३/२०२२ रोजी रात्री घाटबोरी/तेली शिवारातील चुलबंद नदीपात्रातून रेती अवैधरित्या चोरटी वाहतुक करून नेल असल्याची खबर श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांना मुखबीर कडून मिळाल्यावर मोज़ा घाटबोरी / तेली शिवारात पोलीस स्टॉपसह जावुन पाहणी केले असता चुलबंद नदीपात्रात एक ट्रक्टर ट्रालीमध्ये एक बास गौण खनिज रेती भरलेला दिसुन आला. पोलीसांना पाहून ट्रक्टर चालक पळुन गेला, सदर ट्रक्टर चालक मालक हे शासकिय मालमत्ता गौण खनिज रेती अवैदयरित्या चोरी करुन नेत असल्याची खात्री झाल्याने रेती अंदाजे एक ब्रास किमती ३५००/- रु. व महीद्रा कंपनीचा ट्रॅक्टर कि. ४,००,०००/- रुपये असा एकुण ४०३५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून आरोपी देवानंद सदाशिव वंजारी रा.घाटबोरी / तेली यांचे विरुदध कलम ३७९ भादवी
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार हरीश्चंद्र शेंडे करीत आहेत. सदर कारवाई मा. श्री विश्व पानसरे सा पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सा. देवरी, पोनि श्री सचिन बांगडे ठाणेदार पो.स्टे. डुग्गीपार, सपोनि श्री संजय पांढरे, पोलीस नाईक फुलबांधे, सोनटक्के, चालक हवालदार कनपुरीया उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी व पोलीस स्टेशन डुग्गीपार येथील अमलदार यांनी केली आहे.