News24 Today

Latest News in Hindi

डेपो डोंगरगाव येथील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या अवैध वृक्ष तोडेत तीन मजुरांना अटक.

1 min read

• डोंगरगाव डेपो येथील सतीटोला गावाजवळ अवैध वृक्षतोड प्रकरण आले उजेडात… लाखोंचा मुद्देमाल हस्तगत.

गोंदिया,सडक अर्जुनी,18 मार्च 2022- तालुक्यात अवैध वृक्षतोड ठेकेदार आणि अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने होते अशी चर्चा आपण अनेकदा एकली असेल मात्र अश्या घटना मध्ये नेहमी गरीब मजुरांचा बळी घेतला जातो, त्या मुळे बोके झालेले ठेकेदार आणि अधिकारी कर्मचारी कुणालाही जुमानत नाही, यावर लाचार प्रशासन, अशिक्षित नागरिक, आणि लालची ठेकेदारांच्या संगनमताने सर्व प्रकार घडतात हे ही तितकेच खरे आहे.

वन जमिनीतील झाडे नष्ट करण्यासाठी झाडाला घापी लावण्याचा प्रकार.


तालुक्यात सर्वाधिक अवैध वृक्ष तोड, वन जमितील वाळू वाहतूक तर वन जमीन अतिक्रमण चे चित्र पाहण्यासाठी मिळते एकंदरीत वन जमीच्या झाडांची कत्तक करण्यासाठी त्याला घापी लाऊन ठेवल्याचे चित्र पाहण्यास मिळते मग हे चित्र अधिकाऱ्यांच्या लक्ष्यात येत नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त असे आहे की : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या सह वनक्षेत्रकार्यालय डोंगरगाव/ डेपो येथील जंगलातील लाकडे चोरून नेल्याची बाब आज 17 मार्च रोजी उघडकीस आली आहे.

• वन जमिनीतील झाडांची कत्तल चे चित्र.


सदर झाडे कापल्याचा आरोप करित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. वनकर्मचारीच्या सहकार्यातून असे जंगलातील झाडे अनेक कापल्याचा प्रकार पुढे येत आहे, सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अजून मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणात काही वनकर्मचारी गुंतले तर नसतील ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सतीटोला परिसरात अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात होत आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/ डेपो परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल.

प्रदीप पाटील : वनसंरक्षक अधिकारी ( रोहयो, वन्यजीव ) गोंदिया.

डोंगरगाव /डेपो येथील सतीटोला गावा जवडील जंगलातील 6 झाडे कापण्याची माहिती मिळताच, त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, सदर झाडे कोणी कापली, त्याबद्दल चौकशी सुरू आहे. सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

सुनील मडावी : वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी.

सदर प्रकरणाची माहिती मला मिळताच मी ,माझे वनरक्षक व वनमजूर यांना सदर जागेवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यांनी कार्यवाही केली व चौकशी साठी प्रकरण माझ्या कडे आले व मी चौकशीत तीन आरोपींना अटक केली. -जी.एस. सयाम वनपरिक्षेत्र सहायक डोंगरगाव.


रसिकला हरिदास दियारे, मु. डोंगरगाव डेपो माझा मुलगा आणि अन्य दोन मजुर किशोर मानकर या ठेकेदार च्या कामावर लाकूड तोडण्यासाठी गेले होते, मात्र त्यांनी अवैध सगवांची लाकडे तोडली म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या तिघांना आज ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे समजते ते आता बोलत नाही पूर्वी बोलत होते, ठेकेदार यांनी सदर आरोप तुम्ही आपल्या अंगावर घ्या बाकी मी पाहून घेईन असे म्हणल्याचे सांगितले आहे, येवढाच नाही तर झाडे कापताना वन विभागाचे लोक घटना स्थळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *