साकोली येथे चारचाकी वाहनाने दिली आइस्क्रीम ठेल्याला धडक.
1 min readभंडारा,साकोली- दिनांक 13 मार्च 2022 रोजी सायंकाळी 8 वाजे दरम्यान साकोली येथे नॅशनल हायवे 6 , मदन रामटेके यांचा घरा समोर नागपूर वरून रायपूर कडे जाणारी टीयुवि 3oo चारचाकी क्र. CG 04 LC 3620 या वाहनाने फुटपाथ वरील आइस क्रीम चा ठेल्याला जबर धडक दिल्याने आइस्क्रीम ठेला चालक गंभिर पणे जखमी झाले,जखमी चे नाव विनोद राऊत असून त्यांना श्याम हॉस्पिटल येथे भर्ती करण्यात आले. तसेच चारचाकी नुक्षानग्रस्त झाली.तसेच घटनास्थळी युथ काँग्रेस कमिटी चे कार्यकर्ते सोनू बैरागी , प्रज्वल रोकडे,शैलेश गोबाडे ,लीलाधर मुरकुटे, रितिक तिडके ,सौरभ राऊत, अंकुर रामटेके, रितीक बडोले, अनिकेत खांडेकर, यांनी कार काढण्यात मदत केली व जखमींना रुग्णालयात पोहचविले.