नागपूरमध्ये कचऱ्यात सापडले पाच ते सहा भ्रूण.
1 min readवृत्तसेवा,नागपूर –नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या क्वेटा कॉलनीत पाच ते सहा भ्रूण सापडले आहेत. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या क्वेटा कॉलोनी परिसरात मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या कम्पाऊंड वॉलनजीक कचऱ्यात ही भ्रूण सापडली आहेत पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहचली घटनास्थळी दाखल झाले असून पुढचा तपास सुरु आहे. गर्दीची वस्ती असल्याने या ठिकाणी भ्रूण कोणी आणली टाकली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक नगरसेवक मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. परिसरात काही हॉस्पीटल आहेत, पण हे परिसरातील बाहेरच्या हॉस्पीटलमधून कोणीतरी इथे आणून टाकल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.