News24 Today

Latest News in Hindi

खाडीपार येथे घरफोडी करून 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा माल लंपास.

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी, –प्रकरण असे आहे की, दि.5 ते 6 मार्च रात्रीच्या दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा खाडीपार येथील तुषार सदाशिव परशुरामकर वय 25 वर्ष.यांच्या घरचे लोकं झोपून असताना अज्ञात चोरांनी मागील दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला व उजव्या बाजूच्या खोलीत ठेवलेल्या लाकडी आलमारीतील ड्रॉप चा ताला तोडून त्यामध्ये ठेवलेली सुटकेस काढली व त्या सुटकेस मधील सोन्याचे दागिने, चांदीचा शिक्का व नगदी रक्कम असा एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपयांचा माल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने तुषार परशुरामकर यांच्या तोंडी तक्रारीवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अपराध क्र 41/2022 कलम 457,380 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पांढरे पोलीस स्टेशन डुग्गीपार हे करीत आहेत. सदर घटनेची माहिती आज दि 7 मार्च रोज सोमवारला डुग्गीपार पोलीस स्टेशन तर्फे जारी करण्यात आलेल्या प्रेसनोट द्वारे प्राप्त झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *