पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व कर्यकर्तांनी प्रयत्न करावे – प्रफुल पटेल
1 min read
• पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व कर्यकर्तांनी प्रयत्न करावे – प्रफुल पटेल
• माजी मंत्री श्री सुबोध मोहिते पाटील यांचा फिरत्या दवाखान्याचा उदघाटन

आज नागपुर शहर येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन खासदार मा.श्री प्रफुल पटेल व राज्याचे गृहमंत्री मा. ना. श्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नागपूर सह विदर्भात पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांचे प्रभागात पक्षाच्या बैठकीचे आयोजन करावे. तसेच आपण सर्व मिळून नागपुरात पक्ष मजबूत करू पक्षाच्या पदाधिकऱ्यांनीही पक्ष मजबूत करण्याची जवाबदारी घ्यावी.
कार्यकर्त्यांना कर्तृत्वाच्या आधारावर संधी देण्यात येईल असे अभिवचन या प्रसंगी श्री पटेल यांनी दिले. तसेच विदर्भातील युवक युवतींना रोजगार देण्यासाठी मिहान प्रकल्प आणण्याचे काम आम्ही केले, आताच्या केंद्रातील भाजपा सरकारने मिहानकडे दुर्लक्ष केल्याने आता युवकांच्या हाताला काम नाही त्यांना विदर्भाच्या बाहेर रोजगारासाठी जावे लागते.
युवकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत येणाऱ्या काळात आम्हाला संधी द्या. युवक, युवतीं, कामगार यांच्या हाताला काम मिळावा यासाठी प्रयत्न करु. असे आश्वासन श्री पटेल यांनी दिले.
नागपूर येथे आयोजित कार्यकर्त्यां सभेला सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, रमेशचंद्र बंग, सुबोध मोहिते पाटील, दूणेश्वर पेठे, शेखर सावरबांधे, प्रवीण कुंटे पाटील, दीनानाथ पडोळे, जानबा मस्के, प्रकाश गजभिये, वर्षाताई शामकुळे, प्रशांत पवार, सलील देशमुख, सौ. आभा पांडे, बजरंग सिंग परिहार, दिलीप पनकुले, गंगाप्रसाद गवालवंशी, ईश्वर बाडबुधे, वेड प्रकाश आर्य, सौ. लक्ष्मी सावरकर, शैलेद्र तिवारी,रविनिश पांडे (चिंटू महाराज), गुलशन मुनियार, आनंद शिंग, अफजल भाई, सुखदेव वंजारी, अरविंद भाजीपाले, राजू राऊत, राजू ताकसांडे श्रीकांत शिवणकर, आशुतोष बेलेकर, अफजल फारुखी, सैय्यद भाई, रमेश फुले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपथित होते.