अर्जुनी/मोर पोलीसांनी फिर्यादीला दिली अनोखी भेट चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागीने फिर्यादीस केले परत.
1 min readगोंदिया,अर्जुनी मोरगाव,06 मार्च 2022-दिनांक १२/११/२०२१ रोजी अर्जुनी/मोर येथे राहणारे लता अशोक उईके यांच्या घरी अज्ञात चोरटयाने त्यांचे घरातील सोन्या-चांदीचे दागीने चोरी करुन नेले होते.
अर्जुनी / मोर पोलीसांनी तात्काळ अप क्रमांक ३०७ / २०२१ कलम ४५७,३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करुन तपासाची चक्रे फिरवली. गुन्हयाचा तपास केल्यानंतर आरोपी नामे प्रविण अशोक डेकाटे व गोपीकाबाई संगम गजभीये यांना अटक केली व त्यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेले सर्व ६५,००० /- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागीने हस्तगत केले.
मा. न्यायालयाने सर्व सोन्या-चांदीचे दागीने फिर्यादीस परत करण्याचा आदेश दिल्याने आज रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर यांचे उपस्थितीत फिर्यादी लता अशोक उईके यांना सर्व ६५,०००/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने परत करण्यात आलेले आहेत.
या गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी व सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. यशवंत मडावी व पो. शि. मोहन कुहिकर यांनी केलेला आहे.