तालुक्यातील ‘ड’ यादीतील घरकुलाचे काम सुरु करा -अश्लेष माडे यांची मागणी.
1 min read• तालुक्यातील ‘ड’ यादीतील घरकुलाचे काम सुरु करा- अश्लेष माडे यांची मागणी.
• अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित.
गोंदिया,सडक अर्जुनी,06 मार्च 2022- घरकुलाच्या प्रतीक्षा यादीवरील प्रपत्र ‘ड’ मध्ये नावे असलेल्या कुटुंबाना लाभ देण्यासाठी घरकुलांचे काम सुरु करावे. अशी मागणी अश्लेष माडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाच्या अजेंड्यावर आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे नियोजन या योजनेतून केले आहे. पाच वर्षांपूर्वी शासनानेच लाभार्थ्यांची यादी तयार केली. या यादीबाबाद अनेकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे इच्छुकांकडून प्रपत्र ड भरून घेतले. आता शासनाच्या यादीवरील लाभार्थी संपले आहेत. त्यामुळे प्रपत्र ड भरलेल्याना लाभ देण्यासाठी तात्काळ कामे सुरु करण्याची नितांत गरज आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात अनेक कुटुंबियांनी प्रपत्र ड भरलेले आहे. त्यांची पडताळणी व ऑनलाईन काम पूर्ण झालेले आहेत. दरम्यान यातील अनेकांचे घरे पक्के आहेत. त्यात काहीजण मृत पावले आहेत तर काही दुबार नावांचा समावेश आहे. असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पात्र अपात्र यादीच्या फेर सर्वेक्षणाचे काम सुद्धा शासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे.
प्रपत्र ड मधील गरजू गरीब कुटुंबाना लाभासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली आहे. आता वेळ न घालवता शासनाने याबाबद लवकरात लवकर तोडगा काढावा आणि फेर सर्वेक्षणात घरकुलसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थीच्या घरकुलांचे काम सुरु करण्यात यावे. अशी मागणी ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष व कवी अश्लेष माडे यांनी केली आहे.