सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक ,विविध ज्वलंत समस्यावर चर्चा, वैष्णवी हॉटेल कोहमारा येथे बैठक संपन्न.
1 min readगोंदिया, सडक अर्जुनी, ०६ मार्च 2022 : सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक हॉटेल वैष्णवी येथे आज दुपारी ( ०६ रोजी ) सर्व सदस्यांच्या परवानगीने घेण्यात आली होती, यावेळी तालुक्यातील विविध ज्वलंत समस्यावर चर्चा करण्यात आली, त्यावर तालुक्यातील विविध प्रकारच्या विभागाला निवेदन देण्याचे ठरवीले.
यावेळी तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षक हे शासनाच्या जीआर नुसार मुख्यालय राहणे बंधन कारक असून देखील मुख्यालय राहत नाही, असे निदर्शनास आले आहे, परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्याना तोंड द्यावे लागते.
सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जन माहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी, अपीलीय अधिकारी यांची माहिती दर्शविणारे बोर्ड दर्शनी भागावर लावणे बंधन कारक अस्तान्हा देखील तालुक्यातील शासकीय कार्यालयात हे बोर्ड दिसत नाही, तर तालु्यातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर राहत नाही.
करीता त्या मुळे सामान्य माणसाने अर्ज कुठे करावे या बाबद सभ्रम निर्माण झाले आहे, तर शासकीय कार्यालयात आयपीसी कलमा दर्शविणारे बॅनर लावणे चुकीचे आहे, मात्र तालुक्यात ipc कलमांचे बॅनर लावलेली दर्शनी भागात दिसतात, ही बॅनर सामान्य माणसाला भीती दर्शविणारी आहेत, या सह अन्य समस्या चे निवारण करीता जिल्ह्यातील वरिष्ठांना विविध प्रकारच्या समस्या बाबद निवेदन देण्याचे ठरविले आहे.
यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बबलू मारवाडे, उपाध्यक्ष अश्लेष माडे, सचिव सुधीर शिवणकर, मार्गदर्शक डॉक्टर सुशील लाडे, सदस्य वेद परसोडकर, आकेश बावनकुळे उपस्थित होते, यावेळी तालुक्यातील काही राशन दुकानदार देखील नागरिकांना राशन कमी देतात अशी माहिती मिळाली त्यावर देखील निवेदनात उल्लेख करू यावर चर्चा संपन्न झाली.