तिरोडा; दंतरोग तज्ञ महिला डॉक्टराची गळफांस घेऊन आत्महत्या.
1 min read

गोंदिया,(विशेष प्रतिनिधी)-दंतरोग तज्ञ असलेल्या महिला डॉक्टरने स्वतः राहत असलेल्यां किरायाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ४ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथिल वीर सावरकर वार्ड येथे किरायच्या घरी राहत होती. डॉक्टर नेहा पारधी वय 26 वर्ष असे मृतक डॉक्टर महिलेचे नाव आहे. नेहा मुळची तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील रहावसी आहे. नेहा ने आत्महत्या का केली ह्याचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नाही.
क्लिनिक मध्ये पेंशन्ट येऊन गर्दी करत असतांना डॉक्टरने, नेहा क्लिनिक मध्ये का आली नाही हे बघण्यासाठी हॉस्पीटलचे कर्मचारी गेले असता ती किरायाने राहत असलेल्या घरी गेल्यावर ही संम्बधित घटना उघड़ झाली आहे.
ह्याची माहिती घरमालकाने तिरोडा पोलिसांना दिली असून पोलिस घटना स्थळी पोहतच पंचनामा सुरु केला आहे. तसेच डॉक्टर नेहा ने आत्महत्या का केला याचा ही तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.