News24 Today

Latest News in Hindi

युक्रेन रशिया युद्धात कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू .

1 min read
Ad

रशिया युक्रेनमधील युध्द अधिक तीव्र झाले आहे. तर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह खारकीव्हवर मिसाईल हल्ले सुरू केले आहेत. त्यातच रशियाने खारकीव्ह शहरात केलेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचे अमरिंद बागची यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. परंतू हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये मिसाईल हल्ला केला या हल्ल्यात कर्नाटक येथील नवीन शेखर्प्पा ज्ञानगोदर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

याबाबत अमरिंदर बागची यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, खारकीव्ह येथे झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून परराष्ट्र मंत्रालय मृत विद्यार्थ्याच्या कुटूंबियाच्या संपर्कात आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाने रशिया आणि युक्रेनच्या दुतावासाशी संपर्क साधून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी रशिया आणि युक्रेनच्या दुतावासाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *