मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीचे शिलेदार संस्था नागपूर यांच्या वतीने कवी अश्लेष माडे “माय मराठी सन्मान 2022 “पुरस्काराने ने सम्मानित.
1 min readसडक अर्जुनी –दिनांक 27 फेब्रुवारी रोज रविवार ला जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने राज्यस्तरीय कवी संमेलन, माय मराठी प्रतिनिधिक कविता संग्रह प्रकाशन समारंभ व सत्कार सोहळा सौन्दड येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला राज्यभरातील साहित्यिक,कवी, लेखक उपस्थित होते यावेळी राज्यभरातून आलेल्या प्रसिद्ध कवींनी आपल्या बहारदार कविता कवी संमेलनात सादर केल्या. तसेच राज्यभरातून आलेल्या उपस्थित कवींच्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर च्या वतीने माय मराठी सन्मान 2022 ने गौरव करण्यात आला.यात तालुक्यातील प्रसिद्ध व अनेक पुरस्कार प्राप्त युवक प्रीत कवी अश्लेष माडे यांचा मराठीचे शिलेदार संस्था नागपूर च्या वतीने माय मराठी सन्मान 2022 पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी उपस्थित मान्यवरांचे व मराठीचे शिलेदार संस्था नागपूर चे आभार व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक जिल्ह्यातील कवी आल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक मा. केवलचंद शहारे व मा. किशोर बन्सोड यांनी बोलताना सांगितले.