News24 Today

Latest News in Hindi

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलीक यांना ईडीव्दारे अटक प्रकरणी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे सहभागी

दि . २३ फेब्रुवारी २२ ला महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मा . नवाब मलीक यांना सक्त वसुली संचालनालय भारत सरकार यांनी मुंबई येथे अटक केली असता महाविकास आघाडी व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ईडी ने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ दि . २४ फेब्रुवारी २०२२ ला मुबई येथे मंत्रालयानजीक महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर मौन आंदोलनाचे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाकरीता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार व राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री . मनोहरराव चंद्रिकापुरे आज सकाळीच ८.०० च्या विमानाने नागपूरहून मुंबईला दाखल झाले व राज्याचे उपमुख्यमंत्री मा . अजीतदादा पवार , खासदार सुप्रिताताई सुळे , राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंत पाटील इतर मंत्रयासमवेत स . १०.०० वा . सहभागी झाले या आंदोलनात अर्जुनी मोरगाव विधासभा क्षेत्राच्या तमाम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांचा वतीने आमदार श्री . मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी सहभाग नोंदविला आहे व केंद्र सरकारने केलेल्या सरकारी यंत्रणेच्या दुरूपयोगाचा निषेध नोंदविला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *