सौंदड येथील तलाठी यांचे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,23 फेब्रुवारी 2022- तालुक्यातील चुलबंद नदीच्या वाळू घाटावरून अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे, ही कारवाई सौंदड पिपरी परिसरात करण्यात आली आहे, वाहन मालक नामे सुवास यशवंत चांदेवार, असे असून वाहन क्रमांक इंजिन नंबर – एम. एच. 36 – 9724, तर दुसरे वाहन मालक चालक नामे राजू मोहन चांदेवार राहणार दोन्ही गोंडउमरी , तालुका साकोली , जिल्हा भंडारा, ट्रॅक्टर क्रमांक – इंजिन नंबर एम. एच. 36, 6473 असे आहे, विशेष म्हणजे दोन्ही वाहनाच्या ट्रोलीचे नंबर नाही, ही कारवाई आज सकाळी 08 वाजता वाघधरे तलाठी यानी केली असून, सहकारी नंदागवळी तलाठी, पोलीस पाटील सत्यभामा कोल्हे व इतर गावकरी यावेळी उपस्थित होते, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई होणार असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.