News24 Today

Latest News in Hindi

विना नंबर प्लेट फिरणाऱ्या अवैध वाहनावर कारवाई करा; तालुका मराठी पत्रकार संघातर्फे विविध शासकीय कार्यालयात निवेदन.

1 min read
Ad

गोंदिया,सडक अर्जुनी,22 फेब्रुवारी 2022- तालुक्यात विना नंबर प्लेट फिरणाऱ्या, अवैध वाहनावर दंडात्मक कारवाई करण्या बाबद आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील तहसीलदार, ठाणेदार,आणि महामार्ग पोलिस यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय, महामार्ग पोलिस अधिकारी नागपूर यांना तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की , सडक अर्जुनी तालुक्यामध्ये शासनाची संपत्ती लुटण्याच्या उद्देशाने ( अवैध कामे करण्याच्या उद्देशाने ) काही बोटावर मोजकी लोक आपल्या वाहनाला नंबर प्लेट लावत नाही, ही वाहने अवैध व्यवसाय करण्यासाठी वापरली जातात असे लक्षात येते, यात दुचाकी वाहन, फोर व्हीलर, ट्रॅक सर्व, ट्रक्ष, टमटम, ट्रॅक्टर व ट्रॉली , जेसीबी, या सारख्या वाहनाचा सर्रास वापर केला जातो, ही वाहने जनावरांची तस्करी, मुरूम , रेती, गिट्टी, उत्खनन व वाहतुकी साठी वापर केल्या जाते तर अवैध कामावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नजर पाळत ठेवण्यासाठी या वाहनाचा वापर केला जातो, ही बाब पत्रकारांच्या लक्ष्यता आली आहे, ही वाहने अधिकाऱ्यांना भेटू नये, व त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये म्हणून असा प्रकार हेतू परस्पर केला जात आहे, ही वाहने मार्गाने भरधाव वेगाने पळविली जातात, अश्यात वाहणा समोर येऊन एखाद्याचा जीव गेल्यास ही वाहने मिळून येत नाही, त्यातच तालुक्यात शेती च्या नावावर सबसिडी घेऊन ट्रॅक्टर चा (अग्रिकल्चर)वाहनाचा सर्रासपणे कमर्शियल वाहन म्हणून रेती, माती, मुरूम, गिट्टी, वाहतुक करण्यासाठी वापरतात. शासकिये अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन रोड टॅक्स लपविला जाते, त्या मुळे अन्य शेतकऱ्यांचा देखील मोठा नुक्षांन होत आहे, ही वाहने ग्रामीण भागात ज्यास्त फिरतात, करीता तालुक्यात विना नंबर प्लेट मार्गावर फिरणाऱ्या वाहनावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करिता तालुका मराठी पत्रकार संघ सडक अर्जुनी द्वारे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी अध्यक्ष – बबलू मारवाडे,उपाध्यक्ष – अश्लेष माळे,मार्गदर्शक – सुशील लाडे,सदस्य – वेद परसोडकर आणि इतर सदस्य गण प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *